आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेतेमंडळी व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. मात्र या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता भाजपाचे आमदार नितेश राणे हे पुन्हा एकदा त्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे.
शरद कोळी भडकले :
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. जर कोणी रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलाल, तर मशिदीत घुसून चून चून के मारेंगे असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला होता. तसेच नितेश राणे यांनी मशिदीकडे बघून गोळी झाडल्याचा इशारा देखील केला.
मात्र आता नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे विरोधी पक्षाने निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी भाजप आमदार नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी म्हणाले की, “मशिदीकडे बघून गोळी झाडल्याचा इशारा काय करतोस? मात्र महाराष्ट्रातील जनता तुझे हात कलम केल्याशिवाय शांत राहणार नाही असं शरद कोळी म्हणाले आहेत.
नित्या राणे दलाली करायचे बंद कर अन्यथा… :
तसेच “नितेश राणे आणि त्याचा बाप हा दलाल असून स्वतःला गब्बर म्हणतोय. मात्र गब्बर हा लोकांवर अन्याय करणारा, लोकांच्या घरावर दरोडे टाकणारा होता. त्यामुळे तू देखील जातीयवादी औलाद असून महाराष्ट्रावर दरोडा टाकतोय अशी सडकून टीका शरद कोळी यांनी नितेश राणेंवर केली आहे.
याशिवाय महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याची तू दलाली घेतली आहेस. तसेच मराठा, ओबीसी, मुस्लिम विरोधात बोलून युवकांची माथी भडकवून राज्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न तू करत आहेस. त्यामुळे नित्या… दलाली करायचे बंद कर अन्यथा गब्बरची जशी हालत झाली तशी तुझी होईल. तसेच “देवेंद्र फडणवीस या नित्या राणेचा लवकर बंदोबस्त करा, नाहीतर आमचं सरकार आल्यावर त्याची काय अवस्था केली जाईल ते बघा असा थेट इशारा शरद कोळी यांनी दिला आहे.
0 Comments