“कंगना संसदेत बसायच्या लायकीची नाही, तिने..”; कुणी केली जहरी टीका?


अभिनेत्री तथा खासदार कंगना रनौत कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहत असतात. मागे कंगना यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. यामुळे संसदेत चांगलाच गदारोळ माजला होता. अशात कंगनावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.

शेतकरी आंदोलनावरून कंगना यांनी केलेल्या वक्तव्यानंतर रॉबर्ट वड्रा यांनी टीका केली.महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर संपूर्ण देशाला एकत्र यावे लागेल, असंही ते म्हणाले.रॉबर्ट वड्रा हे काल (30 ऑगस्ट)हैद्राबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान, रॉबर्ट वड्रा यांनी कंगनावर निशाणा साधला.

काय म्हणाले रॉबर्ट वड्रा?
“कंगना रनौत या एक स्त्री आहेत, मी त्यांचा आदर करतो. मात्र,त्या संसदेत बसण्याच्या लायकीच्या आहेत, असं मला वाटत नाही. त्या (कंगना) शिक्षित नाहीत. मला असं वाटतं की त्या इतर व्यक्तींबद्दल विचार करत नाहीत. त्या फक्त स्वतःचा विचार करतात. त्यांनी महिलांचा विचार करायला हवा. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर संपूर्ण देशाने एकत्र पुढे आले पाहिजे.”, असं रॉबर्ट वड्रा म्हणाले.

तसेच, देशात महिलांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन देखील रॉबर्ट वड्रा यांनी केले. आता यावर कंगना काय प्रत्युत्तर देणार ते पाहावं लागेल.

कंगना नेमकं काय म्हणाल्या होत्या?
“शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होत होतं, ते सगळ्यांनी पहिलं आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता”, असं कंगना  म्हणाल्या होत्या.

कंगना यांच्या या विधानावर भाजप नेतृत्वाने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर भाजपने आपली भूमिका देखील स्पष्ट केली होती. कंगनाने केलेल्या वक्तव्याचा भाजपशी काहीच संबंध नाही, असं भाजपने अधिकृत पत्र जाहीर करत म्हटलं होतं

Post a Comment

0 Comments