दक्षिण चित्रपटसृष्टीतील मल्याळम चित्रपटसृष्टीत सध्या खळबळ उडाली आहे. चित्रपटसृष्टीत महिला कलाकारांच्या लैंगिक शोषणाची तक्रार समोर आल्यानंतर केरळ सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे, जे या प्रकरणाची ठळकपणे चौकशी करणार आहे. यामध्ये अनेक वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मल्याळम चित्रपटसृष्टी हादरली :
लैंगिक छळाच्या आरोपांमुळे मल्याळम चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार, अभिनेता सिद्दीकी आणि दिग्दर्शक रंजीत यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. अशातच या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांच्या छळ आणि शोषणाची प्रकरणे उघड झाली आहेत.
एका मल्याळम अभिनेत्रीने मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस सिद्दीक यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अधिकृतपणे AMMA अध्यक्ष मोहनलाल यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. एका बंगाली अभिनेत्रीने प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रंजित यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला त्यानंतर त्यांनी ही टीका पाहता केरळ चालचित्र अकादमीचा राजीनामा दिला आहे.
हॉटेलमध्ये बोलावून गैरवर्तन केलं :
राजीनामा दिल्यानंतर अभिनेते सिद्दीकी म्हणाले, “होय, मी माझा अधिकृत राजीनामा संस्थेचे अध्यक्ष मोहनलाल यांना दिला आहे. कारण माझ्यावर आरोप होत आहे. त्यामुळे मी पदावर न राहण्याचा निर्णय घेतला आहे.” तसेच लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीने दावा केला आहे की, वयाच्या 21 व्या वर्षी तिच्यासोबत लैंगिक शोषणाची घटना घडली होती.
त्यावर तो म्हणाला, ही घटना नीला थिएटरमध्ये दाखवल्या जात असलेल्या मल्याळम चित्रपटादरम्यान घडली. चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी त्यांनी मला हॉटेलमध्ये बोलावले. संभाषणादरम्यान, त्याने मला प्रेमाने आपली मुलगी म्हटले, परंतु तो माझ्याशी गैरवर्तन करत होता. तसेच अभिनेत्री म्हणाली, “त्यावेळी त्याच्या मनात काय चालले होते याची मला कल्पना नव्हती. मी एका प्रोफेशनल मीटिंगसाठी त्या हॉटेलमध्ये गेले होते. तिथे माझ्यासोबत हे सर्व घडेल याची मला कल्पनाही नव्हती. मात्र ही धक्कादायक गोष्ट घडल्यामुळे मला देखील धक्का बसला आहे.
0 Comments