बार्शी |
गेल्या 38 वर्षापासून नर्मदा घाटीसह देशाच्या विविध भागात शेतकरी, श्रमिक, मजदूर, आदिवासी आदि, ज्यांसाठी हे संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर त्यांच्यावर लावलेले खोटे आरोप त्या अनुषंगाने दिलेली शिक्षा महामहीम राष्ट्रपती यांनी रद्द करण्याचे निर्देश त्वरित द्यावेत. याविषयीचे निवेदन जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय बार्शी तालुक्यातील स्थानिक कार्यकर्ते आकाश दळवी यांनी आज तहसीलदार बार्शी यांना दिले.
निवेदन बार्शी तहसीलदार देतेवेळी (सहजीवन सेवाभावी संस्था संस्थेचे अध्यक्ष) बालाजी डोईफोडे, मकरोज बोकेफोडे (असंघटित कष्टकरी महासंघ बार्शी), दयानंद पिंगळे (मा.अण्णा हजारे भ. वि. ज.न्यास बार्शी) , उमेश नेवाळे (युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष(श. प.गट), विजय घोंगडे आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेधाताई पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन संपूर्ण देशात परिचित असून आज तागायत आदिवासी मजदूर शेतकरी आधी सर्व अन्यायग्रस्त विस्थापित यांच्या संघर्षाला धरून सुरू आहे आजही नर्मदा घाटी मध्ये हजारो परिवारांचे पुनर्वसन होणे शिल्लक असल्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांचे याविषयीचे आंदोलन सुरूच आहे. अशा परिस्थितीत सत्तेचा दुरुपयोग करून त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना शिक्षा देणे हे लोकशाही व संविधान मूल्यांचा विरोधात आहे. संपूर्ण कृत्य गैरकानुनी व अन्यायकारक असल्याने महामहीम राष्ट्रपती यांनी स्वतः त्वरित लक्ष घालून शासनास पाटकर यांना दिलेली शिक्षा निर्देशित करावी अशा आशयाचे निवेदन जनआंदोलन राष्ट्रीय समन्वयाचे बार्शी तालुका समन्वयक मनीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तहसीलदार यांना दिले.
0 Comments