Urfi Javed ‘मी कधीच बोल्ड सीन करणार नाही’; उर्फीने सांगितलं कारण


उर्फी जावेद ही अनेक कारणाने चर्चेत असते. तिच्या पेहरावाची नेहमी चर्चा होताना दिसत आहे. तिला बोल्ड राहायला आवडतं. पापाराझींना उर्फी जवळ आल्यावर तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद कारायला आवडतं. पण तुम्हाला उर्फीचे बोल्ड अंदाज ठाऊक असतीलच. मात्र आता उर्फीने बोल्ड सीनवर भाष्य केलं आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं तरीही घाबरू नका. 

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर तिच्या बोल्ड अंदाजाला घेऊन चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होताना दिसतात. मात्र आता उर्फीनेच एका मुलाखतीत बोलत असताना वक्तव्य केलं की मी बोल्ड राहते मात्र मला एखादा बोल्ड सीन करण्यासाठी मी कम्फर्टेबल नसल्याचं उर्फी म्हणाली आहे. ती म्हणाली की असा मी कोणताच प्रोजेक्ट करणार नाही ज्यामध्ये बोल्ड सीन केले जातील.

टेलीटॉक इंडियाला उर्फीने नुकतीच मुलाखत दिली त्यामध्ये तिने आपल्या पेहरावावर आणि तिने तिच्या बोल्ड सीनबाबत मोठं वक्तव्य केलं. ती म्हणाली की जर एखादी स्क्रीप्ट मला आवडल्यास त्यात काही बोल्ड सीन असतील तर मी चित्रपटकर्त्यांना तांत्रिक बाबींचा त्यात सामावेश करण्यासाठी सांगेल आणि बोल्ड सीन इफेक्टच्या माध्यमातून क्रियेट करायला सांगेल.

तिने त्यानंतर सांगितलं की ती यापुढे कधीही टीव्ही सिरियल्समध्ये काम करणार नाही. त्यानंतर उर्फीने बॉलिवूडची अभिनेत्री आणि बिग बॉसची कंटेस्टंट राखी सावंतवर भाष्य केलं आहे. राखी सावंत ही एक ड्रामा क्वीन असल्याचं उर्फी जावेदने  म्हटलं.

उर्फी जावेदला ड्रामा क्वीन म्हणून संबोधलं गेलं आहे. मात्र उर्फी जावेद ही स्वत:ला ड्रामा क्विन मानत नाही. उर्फी म्हणते की राखी सावंत हीच खरी ड्रामा क्वीन आहे. जिचा ड्रामा हा कधीच संपत नाही. ती स्वत: तिच्या व्हिडीओचा खूपच आनंद घेताना दिसत आहे.

बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतल्यानंतर उर्फी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आली, जरी ती पहिल्या फेरीतच शोमधून बाहेर पडली, तरी तिला या शोनंतर काम मिळू लागले. उर्फी ही तिच्या फॅशन्स सेन्समुळे तर चर्चेत आहेच मात्र ती तिच्या स्पष्टोक्तेपणामुळे देखील चर्चेत आली आहे.

Post a Comment

0 Comments