बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट


बार्शी |

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी निस्वार्थपणे लढणारे मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीविषयी डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेतली आणि त्यांच्या उपचारांसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या हितासाठी आपल्या आरोग्याची पर्वा न करता सतत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या समर्पणाचे कौतुक करत आमदार राऊत म्हणाले, "मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे."

आमदार राऊत यांनी डॉक्टरांशी चर्चा करून मनोज जरांगे पाटील यांना लवकर बरे होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपचारांची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील आणि भारत पवार हेदेखील उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments