मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध अपशब्द, तिघां जणाविरुद्ध गुन्हा दाखल



मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या तिघांविरोधात बीडच्या शिवाजीनगर  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट केल्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी शिरूर शहर बंद करण्यात आले होते. या बंदमध्ये जे भाषण करण्यात आले त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. या वक्तव्यावरुन माजी जि.प. सदस्य दशरथ वनवे, रामराव खेडकर, रामदास बडे व इतर प्रमुख १५ ते २० जणांविरुध्द बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, त्यानंतर केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर आलं. मात्र, बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे पराभूत झाल्या, तर बजरंग सोनावणे विजयी झाले. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यातीलच एका आक्षेपार्ह पोस्टवरुन मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, आक्षेपार्ह्य पोस्टवरुन निर्माण झालेल्या वादाचे परिणाम काही केल्या थांबायला तयार नाहीत.

Post a Comment

0 Comments