“आता रडीचा खेळ खेळू नका, पराभव मान्य करा”, बंधू भगिनीला सल्ला दिल्याने खळबळ
 बीड लोकसभा मतदारसंघातील निकालावरुन मोठी उत्सुकता राज्याला लागलेली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांना काट्याची टक्कर दिली. शेवटच्या फेऱ्यांमध्ये बजरंग सोनवणे यांनी विजयी लीड घेतल्याची माहिती आहे, मात्र अद्याप निकालाची अधिकृत घोषणा झालेली नाही. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्याने मुंडे बंधू भगिनींना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.


मुंडे बंधू भगिणींना काय सल्ला दिला?

बीडमध्ये पंकजा मुंडे पराभवाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत फेरमतमोजणीची मागणी केली जातेय. मतमोजणी केंद्रावर मोठी गर्दी झाल्याची माहिती आहे. स्वतः मुंडे बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. फेरमतमोजणी करण्याच्या मागणीवर मुंडे ठाम असल्याचं कळतंय. त्यावर आता राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना एक सल्ला दिला आहे. मुंढे बंधू भगिनी आता रडीचा खेळ खेळू नका. पराभव मान्य करा., असं त्यांनी म्हटलं आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे.

बीडमध्ये वातावरण बिघडलं-
बीडमध्ये सध्याचं वातावरण पाहता प्रशासनाने अद्याप अधिकृत निकालाची घोषणा केलेली नाही. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या भागात दोन गटांमध्ये जोरदार वाद झाले होते. त्यामुळे या निकालाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. स्वतः शरद पवार यांनी पोलीस महासंचालकांना या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments