अभिनेता अर्जुन कपूर वाढदिवसानिमित्त त्याने त्याच्या जुहूच्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये शनाया कपूर, संजय कपूर, वरुण धवन आणि जान्हवी कपूर सारख्या स्टार्सनी हजेरी लावली होती. मात्र, अर्जुनची मैत्रीण आणि अभिनेत्री मलायका अरोरा या पार्टीत गायब होती.
एकमेकांपासून वेगळे झाले ?
एकीकडे चाहते अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे दोघांचे ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा आहे. परस्पर संमतीने दोघेही एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या अफवांचा बाजार सुरू आहे.
मलायकाच्या घटस्फोटानंतर...
मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केले. 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मलाइकाला तिचा मुलगा अरहान खानची कस्टडी मिळाली. ती फक्त तिच्या मुलासोबत राहते. मलायका आणि अरबाजच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या आल्या तेव्हा मलायका-अर्जुन एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगली होती.
0 Comments