भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक होण्यास तयार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि गौतम गंभीर यांच्यात याबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर गंभीरने प्रशिक्षक पदासाठी होकार दिला असलयाचे बोललं जात आहे. गौतम गंभीरला तयार करणं जय शाह यांच्यासाठी सोप्प नक्कीच नव्हतं …. मात्र जय शाह यांनी चर्चेदरम्यान असं एक वाक्य बोललं ज्यामुळे गौतम गंभीर नाही बोलू शकला नाही.
रिपोर्टनुसार, आयपीएल 2024 च्या फायनलनंतर जय शाह आणि गौतम गंभीर यांच्यात प्रशिक्षक पदाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जय शाह गंभीरला म्हणाले, आता आपल्याला देशासाठी हे करायचे आहे. गौतम गंभीर हा त्याच्या देशभक्तीसाठी ओळखला जातो. त्यांनी अनेक प्रसंगी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. यामुळेच त्याने जय शाहचे म्हणणे मान्य केले आणि आता तो टीम इंडियात राहुल द्रविडची जागा घेण्यास सज्ज झाला आहे.
दरम्यान, गौतम गंभीर भारताच्या लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जातो. २००७ च्या T20 वर्ल्डकप आणि २०११ च्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात गंभीरनेच दमदार खेळ्या करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. गंभीरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्याशिवाय मेंटॉर म्हणूनही त्यानं यशस्वी काम केले आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात गंभीरचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे गौतम गंभीरच भारताचा मुख्य प्रशिक्षक व्हावा अशी . बीसीसीआयची इच्छा होती.
0 Comments