अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार, या बड्या नेत्यांनी केला खळबळजनक दावा


येत्या 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागल्यावर अजितदादांच्या गटात मोठं बंड होणार आहे. अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही आमदारांना घेऊन बंड करणार आहेत. ते भाजपमध्ये जाणार आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला आहे.

मेहबूब शेख यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. अजितदादा गटाचे अनेक लोक आम्हाला फोन करत असून पक्षात प्रवेश करू इच्छित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

आमच्या पक्षात ज्याचं सिल्वर ओकवर प्रेम आहे, तेच लोक इथे राहिली आहेत. जे इकडं तिकडं पळणारे होते, दुसऱ्यांच्या घरात डोकावणारे होते ते सर्व निघून गेले. आमच्या पक्षातून कोणी आता फुटणार नाही. सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या पक्षाचे बरेच आमदार 4 जून नंतर दुसरीकडे जाण्याच्या शोधात आहेत. अनेकांचे निरोप आमच्याकडे येत आहेत. त्यांना आमच्या पक्षात यायचं आहे. 4 जून नंतर सुनील तटकरे हे काही आमदारांसोबत डायरेक्ट भाजपमध्ये जाणार आहेत. कारण त्यांना शरद पवार यांच्याकडे एन्ट्री मिळणार नाही. त्यामुळे तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे, असा दावा मेहबूब शेख यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments