शरद पवारांच्या सुनबाई नक्कीचं दिल्लीला जाणार

मुंबई |

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणाचे नाव घेतले नाही मग शरद पवारांनी या गोष्टी मनाला का लावून घेतल्या? संजय राऊत हा सर्वज्ञानी आहेत. संजय राऊत नेहमी काँग्रेसचे तुणतुणे घेऊन नाचायचे काम करतात.

महाराष्ट्रातील सगळ्या लोकसभा मतदारसंघात मी जात आहे याचाच भाग म्हणून बारामतीत आले आहे. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्यांकडून असे वक्तव्य करणे शॉकिंग आहे. मात्र असे असले तरी यावेळी शरद पवारांच्या सुनबाईचं दिल्लीला जाणार हे नक्की आहे, असा विश्वास भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

मीडियाशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, रोहित पवारांनी बारामतीमधील एक महिला किंवा पुरुष दाखवावा, ज्यांनी मोदींच्या एकाही योजनेचा लाभ घेतला नाही. गरीब कल्याण योजना २० लाख लाभार्थी, पीएम आवास योजना ७८ हजार, आयुष्मान भारत साडेचार लाख, जनधन योजना १०० टक्के, जल जीवन मिशन योजना २ लाख,आणि पीएम किसान योजना अडीच लाख, स्वच्छ भारत मिशन ९६ हजार एवढ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेतला आहे. कोरोनाची लस आणली, त्याचे शरद पवार आणि कुटुंबीयही लाभार्थी आहेत, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments