माढा मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणार; देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार हल्लाबोल

माढा |

माढा लोकसभा मतदार संघातून राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्याला टार्गेट करायला सुरूवात केली आहे.

याआधी ''माझा विश्वासघात केला तर त्यांचा सत्यानाश होईल'', अशी टीका फडणवीसांनी धैर्यशील मोहिले पाटलांवर केली होती. त्यानंतर आता या तालुक्याला मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणार,असा हल्लाबोल फडणवीसांनी मोहिते पाटील घराण्यावर केला आहे. 


दरम्यान मध्यंतरी सोलापूरात शरद पवार साहेब, सुशील कुमार शिंदे साहेब आणि विजयदादा एकत्र आले होते. या नेत्यांनी एकत्रित येऊन सांगितलं, आम्ही 30 वर्षांनी एकत्रित आलो आहोत. पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी एकत्रित आलो आहोत. पण ही पुढची पिढी म्हणजे पवार साहेब सुप्रीयाताईंच्या भविष्यासाठी, सुशील कुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या भविष्याकरीता आणि विजयदादा धैर्यशील आणि रणजीतदादांच्या भविष्यासाठी एकत्र आले आहेत. तुमच्या भविष्याकरता एकत्रित आले नाहीत, अशा शब्दात त्यांना पवार-शिंदेंवर टीकेची तोफ डागली.

Post a Comment

0 Comments