पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली 'या' चार जागा डेंजरझोनमध्ये?


मुंबई | 

मोदींची सभा म्हणजे विजयाची पक्की गॅरंटी, असे समीकरण गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपासून बनले होते. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अनेकांची नैय्या पार झाली होती.

2024 च्या लोकसभा निवडणुकी आधी झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतही मोठ्या तीन राज्यात लोकांनी 'मोदी गॅरंटी'वर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील महायुतीच्या उमेदवारांना मोदी गॅंरटीचा आधार मिळतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठवाड्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आठही लोकसभेच्या मतदारसंघात झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आठपैकी पाच मतदारसंघात यावेळी सभा घेतल्या.

म्हणजे जवळपास सगळ्या मराठवाड्यात मोदींनी प्रचार केला. नांदेड, बीड, लातूर या तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर धाराशिव, परभणी या दोन जागा महायुतीतील घटक पक्षाला सोडण्यात आल्या होत्या.

Post a Comment

0 Comments