उद्धव ठाकरेमुळेच मी काँग्रेस सोडला, मिलिंद देवरा यांचा खळबळजनक दावा



मुंबई |

लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होती. आता निकालाची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागली आहे. या निवडणुकीच्या आधी अनेकांनी आपला पक्ष सोडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपात जाणं पसंत केलं.

मुंबई काँग्रेसचे दिग्गज नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता लोकसभा निवडणुकीचे टप्पे संपल्यानंतर उद्धव ठाकरेंमुळे मी पक्ष सोडला असं मिलिंद देवरांनी म्हटलं आहे.

काँग्रेस आता माझ्यासाठी भूतकाळ आहे. मला आता भविष्याकडे बघायचं आहे. दक्षिण मुंबई हा मला सगळ्यात उत्तम मतदारसंघ वाटतो. मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला हे स्पष्ट सांगितलं होतं की आपण ही जागा गमवायला नको. मात्र उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर खूप दबाव टाकला. त्यामुळे मला बाहेर पडावं लागलं असं मिलिंद देवरांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी काँग्रेसला शुभेच्छाही दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments