राज्याच्या राजकारणात होणार मोठा भूकंप? उद्धव ठाकरे बद्दल मोदींचे मोठे विधानमुंबई |

२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या ४० आमदारांसह भाजपसोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यात दुरावा निर्माण झाला.

उद्धव ठाकरे तर जाहीर सभेत मोदींवर टीकेची तोफ डागत आहेत तर दुसरीकडे मोदी सुद्धा ठाकरेंना नकली शिवसेना म्हणत डिवचत आहेत. मात्र याच दरम्यान, आता मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत, त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन असं मोदींनी म्हंटल आहे. मोदी यांनी उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे खुले केले आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालाय.

मोदी पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांचे माझ्यावरील प्रेम आणि उपकाराची मी परतफेड कधीही करू शकत नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात आमचे सर्वाधिक आमदार आहेत. तरीही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. मी बाळासाहेब ठाकरेंना वाहिलेली ही एक प्रकारे आदरांजली आहे. बाळासाहेब ठाकरेंवर माझी खूप श्रद्धा आहे, मी त्यांचा आदर आजही करतो आणि यापुढे आयुष्यभर करत राहिन. मात्र उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत, असेही मोदींनी म्हंटल.

Post a Comment

0 Comments