पंतप्रधान लहान मुलासारखे रडतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोललोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील जागांवरील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यानिमित्त काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज नंदूरबार येथे गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणता मी एकटा भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे. त्यामुळे हे लोक मला शिव्या देतात. जेव्हा जेव्हा प्रचारासाठी येतात आणि बोलतात तेव्हा तेव्हा ते लहान मुलांसारखे रडता. 

यावेळी प्रियंका यांनी देशातील अनेक मुद्यांवर बोलत पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न केला. तुमच्या संस्कृतीवर ते सतत हल्ले करत आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या अधिकारांवर बोलता तेव्हा तेव्हा तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. हेमंत सोरेन देशातील एकमेव आदिवासी मुख्यमंत्री आहेत. आणि झारखंडमध्ये निवडणुका सुरू असताना त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तुमच्या संस्कृती आणि समाजावर भाजप आणि आरएसएस सतत हल्ला करत आहे, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला.

Post a Comment

0 Comments