लग्नाआधी बच्चन कुटुंबीयांनी केली होती ‘ही’ मागणी, ऐश्वर्याने दिलेला नकार


मुंबई |

अभिनेता अभिषेक बच्चन आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन  हे दोघेही नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून दोघेही एकमेकांपासून दूर राहत असल्याच्या चर्चा होत्या. दोघेही एकमेकांपासून कायमचे विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यांचा विवाह हा 2007 मध्ये झाला. त्यांना आता आराध्या नावाची मुलगी आहे. 

ऐश्वर्या राय  आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नापूर्वीचा एक किस्सा चर्चेत आहे. कदाचित तो आपल्याला माहित नसेल. ऐश्वर्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हा ही गोष्ट अभिषेकने आपल्या घरी सांगितली होती. यानंतर बच्चन कुटुंबीयांनी रोका समारंभ करण्याची मागणी केल्याने ऐश्वर्या नाराज होती कारण तिला विधीबद्दल काहीही माहिती नव्हतं.

ऐश्वर्याने अभिषेक बच्चनला त्याच्या कुटुंबाला घरी येण्यापासून थांबवण्यास सांगितलं, पण त्यालाही काही करता आलं नाही. त्यानंतर बच्चन फॅमिली मिळून ऐश्वर्याच्या घरी रोका करण्यासाठी गेले. मुळात ऐश्वर्या ही साऊथ इंडियन असल्याने याबाबत तिला तशी फरशी समज नव्हती.

तिनं अभिषेकला आपल्या कुटुंबाला घरी येण्यापासून रोखण्यास सांगितलं होतं. मात्र अभिषेकने देखील आपण काहीही करू शकणार नसल्याचं सांगितलं. ती गोंधळून गेली. तिला काय करावं हे कळत नव्हतं. तिला या सोहळ्याबाबत फारशी माहिती नव्हती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचे वडील घरी नव्हते. आई आणि ऐश्वर्या घरी होती.

बच्चन कुटुंब घरी आले आणि लग्नापूर्वीचा सोहळा ऐश्वर्याच्या घरी पार पडला. त्यावेळी ऐश्वर्या रायचे वडील फोन कॉलवर उपस्थित होते. ऐश्वर्याला विधीबाबत फारसं माहिती नसल्याने ती नाराज होती. तिला काय करावं हे समजलं नाही, यामुळे ऐश्वर्याचा गोंधळ उडाला होता. ऐश्वर्या रायने मनोरंजन क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना मुलगी आहे. आराध्या असं तिचं नाव आहे. आराध्या अनेकवेळा आई-वडिलांसोबत स्पॉट झाली आहे.

दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात वाद असल्याची चर्चा आहे. ते गेले अनेक दिवस एकमेकांपासून दूर राहत असल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची माहिती समोर आलीये. तसेच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेनी जोर धरला आहे

Post a Comment

0 Comments