हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाबाबत मोठी माहिती समोर


हार्दिक पांड्याला यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधार पद दिलं गेलं. यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते पांड्यावर संतापले होते. पहिल्यापासूनच मुंबई इंडियन्स चाहत्यांचा पांड्यावर रोष होता. त्यात त्याने म्हणावी अशी कामगिरीही केली नाही. त्यामुळे चाहत्यांनी त्याचा खूपच राग राग केला. सध्या त्याची पब्लिसिटी धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. नताशाने त्याच्या संपत्तीवर 70 टक्के हिस्सा मागितल्याचा दावा केला असल्याचं  काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. अशातच आता पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाबाबत  एक माहिती समोर आली आहे. 

आयपीएल संपूनही पांड्या आणि नताशा चर्चेचा विषय ठरले आहेत. पांड्याने आयपीएलमध्ये म्हणावी अशी कामगिरी केली नाही. यामुळे त्याला अनेकजण ट्रोल करू लागले आहेत. कर्णधारपदाची धुरा सांभाळताना तो कुठे तरी चुकला असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अशातच पांड्याची इमेज डेव्हलप करण्यासाठी सध्याच पांड्याच्या घटस्फोटाचा मुद्दा काढला गेल्याचं बोललं जात आहे. 

सध्या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. ही पोस्ट पाहून लोकं हैराण झाली आहेत. Reddit वर पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये नताशा आणि पांड्याबाबत मोठा खुलासा होताना दिसतोय. 

या पोस्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे. आयपीएलमध्ये खराब झालेली इमेज आणि नेटकऱ्यांकडून होणारं ट्रोलिंग याच्यासाठी ही पब्लिसिटी स्टंट केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील घटस्फोटावर अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाही.

नताशाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली. त्यात लिहिलं की, एक व्यक्ती लवकरच रस्त्यावर येणार आहे. त्यानंतर ती पांड्याबद्दल बोलत असल्याचा तर्कवितर्क लावला जात आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 2020 लग्न केलं. पांड्या आणि नताशाला एक अगत्स्य नावाचा मुलगा देखील आहे.

पांड्या हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. मात्र त्याने एका व्हिडीओत बोलत असताना सांगितलं आहे की, मी माझ्या नावावर संपत्ती ठेवली नाही. माझ्या कमाईच्या गाड्या आणि घरं हे मी माझ्या आईच्या नावावर ठेवले आहे. मला असं नाही वाटतं की कोणीही यावं आणि 50 टक्के संपत्तीत हिस्सा मागावा, असं पांड्या एका व्हिडीओत म्हणाला होता.

Post a Comment

0 Comments