मोदींनी लोकसभा निवडणुकीची ग्रामपंचायत निवडणूक केली; 'या' बड्या नेत्याचे टीकास्त्र



मुंबई |

लोकसभा निवडणुकीचे वारे राज्यात जरी शांत झाले असले तरीही देशभरात मात्र प्रचारांचा धुराळा सुरूच आहे. राज्यात एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीदेखील उडी घेतली. एका मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्मण रेषा ओलांडली आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकांचे रूपांतर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये केल्याचे दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “पूर्वीच्या पंतप्रधानांनी त्यांच्या त्यांच्या पक्षांचा प्रचार याआधीही केला आहे, हे खरं आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीचे रूपांतर हे ग्रामपंचायत निवडणुकीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत. ते विधानसभा निवडणुकीतही, तसेच स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्येही तेच करतात.” अशी टीका केली. ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधान मोदींचे प्रचारादरम्यान वैयक्तिक हल्ले करणेमी हे अत्यंत वाईट आहे. नरेंद्र मोदींमुळे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खालावली आहे. एवढेच नव्हे तर, सत्ताधारी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेचा कसा वापर करतात, हे या निवडणुकीनं दाखवून दिले.” असे आरोप त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments