पाटसांगवी येथे मतदान केंद्राजवळच चाकू हल्ला, एकाचा मृत्यू

भूम |

मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर जात आहेत. दरम्यान, राजकीय गटांमध्ये राजकीय वाद उफाळून येण्याच्या घटना घडत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राजवळ घडलेल्या अशाच एका घटनेत दोन गटांमध्ये झालेल्या वादातून चाकूहल्ला झाला आहे. ज्यामध्ये एकाचा मृत्यू तर तीघे जण गंभीर जखमी झाले आहेत. राजकीय वैमनस्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घडल्या प्रकारामुळे परिसरातील तणाव आणि राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता बोलली जात आहे.

धाराशिव जिल्ह्यात असलेल्या भूम तालुक्यातील पाटसांगवी गावात ही घटना घडली. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्र परिसरात दोन राजकीय गटांमध्ये मतदार आणण्यावरुन वाद झाला. किरकोळ वादाचे पर्यावसन मोठ्या हाणामारीत आणि पुढे चाकूहल्ला होण्यात झाले. दोन्ही गट परस्परांवर चालून आल्याने वाद निर्माण झाला. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले. तिघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. हल्ल्यामध्ये मृत झालेल्या तरुणाचे नाव समाधान पाटील असे आहे. तर, गौरव अप्पा नाईकनवरे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 

चाकूहल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर आरोपी गौरव नाईकनवरे फरार आहे. पोलिसांनी घटनेची तातडीने नोंद घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शिवाय जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Post a Comment

0 Comments