प्रत्येकाचं एक राजकीय गणित असतं. त्यातल्या त्यात राजकारण्यांचं राजकीय गणित हे कमालीचं असतं. असंच काहीसं गणित हे दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचं होतं. त्याबाबतच अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्याची जोरदार चर्चा आहे.
आज (26 मे)) विलासराव देशमुख यांची जयंती आहे. रितेश देशमुख आणि इतर देशमुख कुटुंबाने त्यांना आज अभिवादन केलं आहे. रितेशने आपल्या वडिलांना अभिवादन करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तेव्हा त्यावर हॅप्पी बर्थडे असं कॅप्शन दिलं आहे. रितेशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आलीये.
रितेशने विलासराव देशमुख यांचा एक फोटो शेअर केला आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. विलासरावांनी त्यांच्या कारकिर्दीत राज्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 26/11 ला मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची विलासरावांना सोडावी लागली होती. रितेश देशमुख प्रत्येकवेळी भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
राज्याच्या राजकारणात दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. त्यांच्या जयंतीनिमित्त रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये 2+2 बरोबर 4 असं राजकारणातील गणित नसतं. ते कधी 3 असतं तर कधी 5 असतं पण 4 कधीच नसतं. असं रितेश म्हणाला आहे.
रितेश देशमुख भाऊक
तसेच माध्यमांसोबत मुलाखतीत बोलत असताना रितेश म्हणाला की, मला चित्रपटाची ऑफर आली. मी ही गोष्ट बाबांना (विलासराव देशमुख) सांगितली होती. तेव्हा बाबांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याने मी प्रेरित आहे. ते म्हणायचे की मी माझ्या नावाची काळजी घेईल तुम्ही तुमच्या नावाची काळजी घ्यावी, असं रितेश देशमुख म्हणाला असून तो त्यावेळी भाऊक झाला होता.
0 Comments