सोलापूर |
महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला कुठली स्थान न मिळाल्यानंतर महाविकास आघाडीवर चिडलेल्या प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेतल्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर आले असताना राजकीय स्फोटामागून स्फोट घडविणे चालवले आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आ. प्रणिती शिंदे या भाजपात गेल्याशिवाय राहणार नाहीत असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची काल सोलापुरात सभा झाली. सभेनंतर ते सोलापूर मुक्कामी होते. सकाळी त्यांनी सोलापुरातील माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला. ते पुढे म्हणाले की, संविधान बदलणे हा भाजपाचा प्लॅन आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने दिलेल्या मुलाखतीत संविधानावर भाष्य केले होते. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी भाजप सत्तेत आला तर संविधान रद्द करतील असे सांगितले होते. त्यामुळे मोदी सातत्याने संविधान बदलणार नाही असे सांगत असले तरी संविधान बदलणे हा भाजपाचा गेम प्लॅन असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
0 Comments