हवालदाराच्या मुलीचा विनयभंग करणारा पोलीस निरीक्षक बडतर्फनागपूर |

पोलीस हवालदाराच्या शिक्षित मुलीचा तिच्या घरात शिरून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय सायरे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. सहकारी पोलीस हवालदाराच्या उच्चशिक्षित मुलीला आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवून अश्लील कृत्य करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले. त्याचा न्यायालयाने जामीनही फेटाळला. त्यामुळे त्याला अटक करण्याची तयारी नंदनवन पोलीस करीत असल्याची माहिती आहे.

यूपीएससीची तयारी करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप अकोला येथील खदान पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर आहे. या प्रकरणाने अकोला पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments