सानिया मिर्झाच्या पोस्टने वेधले नेटकरांचे लक्ष भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाची सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकला घटस्फोट दिल्यानंतर सानिया सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अनेकदा अप्रत्यक्षपणे व्यक्त झाली आहे.

त्यामुळे तिने लिहिलेली पोस्ट ही शोएब आणि तिच्या आताच्या परिस्थितीबाबत असू शकते, असा अंदाज नेटकरी बांधतात. बुधवारी सानियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. त्यातील मजकूर वाचल्यानंतर पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी सानियाविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. सानियाची ही पोस्ट मोकळेपणे व्यक्त होण्याबद्दलची होती.

‘याआधी मला कधीच इतकी बोलायची इच्छा झाली नव्हती, पण तरी मी थोडंच बोलले. माझ्या मनात खूप काही वाटलं पण तरी मी गप्प राहिले,’ अशा आशयाची ही पोस्ट आहे. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाला आता जवळपास तीन महिने झाले आहेत. मात्र सानियाच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा शोएबसोबतच्या तिच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे. सानिया आणि शोएबने 2010 मध्ये हैदराबादमध्ये लग्न केलं होतं. भारत आणि पाकिस्तानात या दोघांचं नातं मोठा चर्चेचा विषय ठरला होता. घटस्फोटानंतरही पुन्हा एकदा ही जोडी दोन्ही देशांमध्ये चर्चेत आली.

Post a Comment

0 Comments