खासदार ओमराजे यांच्या शेतात चोरट्याने मारला, पोलिसांचा तपास सुरू


धाराशिव |

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या चोरीच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. धाराशीव जिल्ह्यात देखील चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

या घटनांचा फटका शेतकऱ्यांना देखील बसत आहे. कारण चोरटे शेतातीत विद्युत पंप, केबल, शेती उपयोगी साहित्यांची देखील चोरी करताना दिसतायेत. एक अळीच घटना धाराशीव जिल्ह्यात घटली आहे. धाराशीवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर  यांच्या शेतात चोरी झाल्याची घटना घडलीय. ओमराजे निंबाळकर यांच्या शेतातील विद्युत पंपाची केबल चोरट्यांनी लंपास केलीय.

धाराशिव जिल्ह्यात शेतीपंप तसेच केबल, दुचाकी, दाग दागिने, घरफोड्या या चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. त्यातच चोरट्यांनी आता थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शेतातच डल्ला मारला आहे. चोरट्यांनी शेतातील विद्युतपंपाचे 1200 रुपयांचे केबल चोरुन नेले आहे. कोल्हेगाव शिवारातील शेतात ही चोरी केली आहे. याबाबत अशोक साठे यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदारांच्या शेतातच चोरट्यांनी डल्ला मारल्याने लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

Post a Comment

0 Comments