लोकसभेत तुतारीचे खातही उघडणार नाही, अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा दावा

मुंबई |

लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारीचे खाते उघडणार नाही अशी टीका अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे. संपूर्ण लोकसभा निवडणुकीत तुतारीचा आवाज कुठेच दिसला नसल्याने ही मंडळी वैफल्यग्रस्त झाली आहे.

 अनिल देशमुख आमच्यासोबत येणार होते त्यांना मंत्री पद हवे होते मात्र भाजपने मंत्री पद देण्यास नकार दिला त्यामुळेच ते तिथे राहिले आहेत असा गौप्यस्फोट करतानाच अनिल देशमुख यांनी त्यांच्याबाबतीत माझ्याकडून जे काही सहकार्य झाले त्याची मनात जाण ठेवून वक्तव्य केले असते तर बरे झाले असते. माझी आणि शरद पवार, जयंत पाटील यांची भेट होण्याचे कारणच असू शकत नाही असे चर्चेला पूर्णविराम देताना सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात कॉंग्रेसची वाट बिकट करणारे पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य फारसे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना स्वतःला कधी आपल्या मतदारसंघात फारसे यश राजकीयदृष्ट्या कार्यकर्त्यांना मिळवून देता आले नाही. त्यांनी अशा गप्पा करण्याची आवश्यकता नाही असा टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.

Post a Comment

0 Comments