महादेव जानकर यांचे पुतणे लोकसभेच्या रिंगणात ; भाजपची डोकेदुखी वाढणारमाढा |

माढा लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून प्रवीण गायकवाड यांचं नाव चर्चेत आहे. अशातच आता स्वरुप जानकर यांनी आपण माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकाही केली. भाजपचा पराभव करण्यासाठी आपण रिंगणात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे महादेव जानकर यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे.


स्वरूप जानकर यांनी वीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता केल्यानंतर आता राजकारणात सक्रिय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात भीतीचे वातावरण तयार केले आहे. लोकशाही मोडीत काढून हुकुमशाहीच्या दिशेने वेगवान पावले टाकली जात आहेत. प्रसारमाध्यमांची उघडउघड गळचेपी सुरू असताना न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्यात आणले गेले आहे. यापार्श्वभुमीवर प्रत्येक लोकशाहीप्रेमी नागरिकाने आपली योग्य भुमिका निभावणे गरजेचे आहे. त्यात पत्रकार म्हणून तर अधिकची जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन भाजपला रोखण्यासाठी माढा मतदारसंघातील जनतेला आवाहन करायचे ठरवले आहे. सांविधानिक मूल्यांच्या रक्षणाची भुमिका मांडण्याबरोबरच मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न सोडविण्याचे अभिवचन जनतेला देणार आहे. 

Post a Comment

0 Comments