अभिषेक बच्चनने माझ्यासोबत सेटवर…’, प्रियंका चोप्राने केला गौप्यस्फोटमुंबई |

 बाॅलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांंध्ये अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या दोघांची चांगलीच चर्चा सुरु आहे. या दोघांच्या नात्यामध्ये सर्व काही ठिक नसल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघे लग्नबंधनात अडकले होते. मात्र, त्या आधी अभिषेक बच्चन बाॅलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला डेट करत होता. एवढंच नाही तर, जया बच्चन यांना अभिषेक आणि राणी मुखर्जीचं नातं मान्य होतं. परंतु काही कारणामुळे त्याचं हे नातं फार काळ टिकलं नाही.

अभिषेक बच्चन हा राणी मुखर्जीला डेट करत होता. जया बच्चन बंगाली असल्यामुळे त्यांना राणी मुखर्जी पसंद पडली होती. त्यामुळे राणी मुखर्जीच बच्चन कुटुंबाची सून व्हावी अशी त्यांची इच्छा होती. अभिषेक बच्चनलाही राणी आवडत असल्याचं सांगितलं जातं. काही कारणामुळे दोघांचं नातं टिकलं नाही. दरम्यान एक दिवशी अभिषेक बच्चनच्या फोनवरुन राणी मुखर्जीला एक मेसेज गेला.

ऐश्वर्या सोबत लग्न झाल्यानंतर अभिषेकच्या मोबाईलवरुन राणी मुखर्जाला एक मेसेज गेला होतो. तो मेसेज बघून राणी मुखर्जीला देखील धक्का बसला होता. मेसेजमध्ये असं म्हटलं होतं की, मला आजही तुझी खूप आठवण येते. मात्र हा मेसेज अभिनेत्री प्रियंका चोप्राने केला होता. अभिषेकने माझ्यासोबत अभिषेकने सेटवर मोबाईल घेत मस्करी केली होती. मग मी ही राणी मुखर्जीला मेसेज करत त्यांची मस्करी केल्याचं प्रियंकाने सांगितलं.

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना प्रियंकाने याबाबत खुलासा केला होता. प्रियंका म्हणाली की, तो मेसेज त्याने केला नव्हता. चित्रपटाच्या सेटवर शूटिंगवेळी प्रियांका चोप्रा हिने तो मेसेज अभिषेकच्या मोबाईलवरून राणी मुखर्जीला केला होता. ज्यानंतर प्रियांका चोप्रा हिला पश्चाताप देखील झाला.

Post a Comment

0 Comments