शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला सांगत १५ लाखाची फसवणूक



पुणे |

एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली. ही घटना १ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत घडली.

योगेश सुरेश साहू (वय ३७, रा. सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रॉबर्ट एडरसन, प्रिया यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रिया यादव हिने फेसबुक वरून साहू यांच्याशी संपर्क केला. साहू यांना एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून त्यांना एससीआयई नावाचे ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. साहू यांनी आरोपींना वेगवेगळ्या बँक खात्यांवर १५ लाख रुपये पाठवले. त्यांनी पाठवलेले पैसे परत न देता आरोपींनी त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments