"ओमराजेंचे आरोप बिनबुडाचे, फौजदारी कारवाई करणार"- आमदार राणाजगजितसिंह पाटलांचा इशारा

 

धाराशिव - तेरणा हॉस्पीटलमधील रुग्णांच्या उपचाराबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. ओमराजेंनी केलेले आरोप खोटे असून फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा राणा पाटील यांनी दिला आहे. गेल्या १२ वर्षात जवळपास १ लाख रुग्णांवर तेरणा हॉस्पीटलमध्ये मोफत उपचार करण्यात आले. त्यापैकी २७ हजार रुग्णांना सरकारी योजनेतून लाभ मिळाला तर इतर रुग्णांच्या उपचाराचा खर्च तेरणा हॉस्पिटलने केला, अशी माहिती पाटील यांनी दिली. 

यावेळी बोलताना १६ रुग्णांवर १३८ शस्त्रक्रिया झाल्याच्या ओमराजेंच्या आरोपांना देखील आमदार पाटील यांनी खोडून काढलं. "किडनीच्या आजाराच्या रुग्णांना डायलिसीससाठी अनेकदा उपचार घ्यावे लागतात. कधीकधी एखाद्या रुग्णाला १०-२० वेळा डायलिसीससाठी जावे लागते, त्यामुळे तशी आकडेवारी दिसून येते. एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाही तर अनेक उपचार झाले आहेत. एक तर याला काही समजत नसेल किंवा खोटं बोलत असेल", असं आमदार राणा पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments