सोलापूरची एक बिघडवली तर..., प्रणिती शिंदे यांचा भाजपला थेट इशारासोलापूर |

 केस टाकील, कारखाना सील करीन, अटक करीन, मागच्या केसेस बाहेर काढेन असं म्हणतात. फक्त धमकीचे राजकारण सुरु आहे. त्यांचे मोठे मोठे नेते अशी धमकी देत आहेत. महाराष्ट्र चालवा. इतके धमकी काय देत बसलायत. सोलापूरची एकी बिघडवली तर खबरदार, हे चार हुतात्म्यांचं शहर आहे, असा इशारा सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.

उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापुरात आठ दिवसात पाणी मिळतं त्याचं पाप भारतीय जनता पार्टीचा आहे. स्मार्ट सिटी बनवायचं नुसतं नाटक केलं. एक दिवशी महाराष्ट्र ही गुजरातला चालवायला देतील. मतांची किंमत भाजपाला राहिली नाही. सोलापूर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असं प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments