रोहित शर्माचे शतक व्यर्थ, चेन्नई पुन्हा ठरली सुपर किंग


मुंबई |

इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव झाला.

या सामन्यात रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. १०५ धावा करून तो नाबाद राहिला. मात्र, त्याची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. तत्पूर्वी, सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १८६ धावाच करू शकली. रोहितने दमदार कामगिरी करत ६३ चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि ५ षटकार मारले.

रोहितशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही. इशान किशन २३ धावा करून बाद झाला. तिलक वर्मा ३१ धावा करून बाद झाला. सीएसकेकडून मथिषा पाथिराणा ४ षटकात २८ धावा देत ४ बळी घेतले. तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान यांना १-१ विकेट मिळाली.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ४० चेंडूत ६९ धावा केल्या. शिवम दुबेने नाबाद ६६ धावा केल्या. त्याने ३८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकार ठोकले.

Post a Comment

0 Comments