बार्शी |
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे, कोल्हापूर येथील कन्हेरी मठ येथे होणाऱ्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी जोरदार सुरु झाली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर अध्यक्ष म्हणून चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत.
संभाजीराजे छत्रपती, सतेज पाटील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. समारोप उपमुख्यमंत्री अजितदादांच्या प्रकट मुलाखतीने होईल. मुलाखत सेलिब्रिटी नागराज मंजुळे, वळू व देऊळफेम गिरीश कुलकर्णी, प्रवीण तरडे अथवा जयू माने घेणार आहेत.
संघटनेच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रातील १० व डिजिटल मिडिया क्षेत्रातील ३ दिग्गजांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी दोन दिवसांत आपण नावे सुचवावी तसेच स्मरणिकेचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यासाठी आपण लेख व जाहिराती तातडीने द्याव्यात व आपल्या सूचना आवर्जून सांगाव्यात अश्या प्रकारचे आवाहन संघटनेचे संस्थापक राजा माने यांनी केले आहे.
0 Comments