अभिनेत्री सई ताम्हणकर विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते. नुकतेच सईने तिचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यापूर्वीही तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. सईने या फोटोशूटमध्ये पेस्टल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यावर तिने पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. या फोटोत सई फारच ग्लॅमरस दिसत आहे. मात्र तिचे हे बोल्ड फोटोशूट काहींना आवडले नाही. ‘सई मावशी वेस्टर्न संस्कृती पेक्षा भारतीय संस्कृती भारी’, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.
0 Comments