राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्यासह काही आमदार शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे. तेव्हापासून अजितदादा हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. अशातच आता अजितदादा पवारांच्या आई आशा पवार यांनी देखील अजितदादा हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. परिणामी आता शिंदे सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. अजितदादा यांच्या मातोश्री आशा पवार यांची प्रतिक्रिया देताच लगेच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकरांनी त्यावर सूचक वक्तव्य केले आहे.
सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे वय लहान आहे. परिणामी त्यांना आगामी काळात मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळू शकते. पुढील काळात होणाऱ्या सर्व निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जाणार असल्याचे म्हणत केसरकर यांनी नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. अजितदादा लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात येत असतो. त्यातच आता अजितदादा पवारांच्या आई आशा पवारांनी देखील मुलाला मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
0 Comments