इन्फोसिस कंपनीमध्ये नोकरी लावतो म्हणून बार्शीतील तरुणीला सव्वा लाखाचा गंडा


बार्शी |

बार्शी शहरातील उच्चशिक्षित अशा २६ वर्षीय तरुणीला इन्फोसिस मध्ये नोकरी लावतो म्हणून १ लाख २५ हजाराला गंडा घातल्याची घटना घडली आहे. बार्शीतील आयटी कंपनीत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणीला फसवल्याचा प्रकार घडला आहे. वैदेही विवेक धर्माधिकारी (वय २६) रा. कसबा पेठ बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणीला नामांकित अशा इन्फोसिस कंपनीत नोकरी लावतो. त्यासाठी तुम्हाला अनुभव सर्टिफिकेटसाठी पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील त्यानंतर नोकरीचे बघू असे म्हणून सुरुवातीला २५ हजार नंतर नोकरीसाठी १ लाख रुपये दिले. वेळोवेळी फोन करूनही उडवाउडवीची उत्तरे व फोन टाळणे असा प्रकार लक्षात येतात, तरुणीची फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर शहर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष पोपट साळुंखे रा. वण्याची वाडी, मारुती मंदिराजवळ मासुर ता. कराड जि. सातारा या इसमावर बार्शी शहर पोलिसात भादवी कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments