वैराग |
वैराग भागातील सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन (बाबा) शेख यांनी १ डिसेंबर २०२२ आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली होती, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी व पक्ष वाढीसाठी झटणार असल्याची माहिती बाबा शेख यांनी दिली. गेल्या पंधरा वर्षापासून बाबा शेख सामाजिक क्षेत्रात अग्रणी कार्यकर्ते मानले जातात.
गेल्या काही दिवसापूर्वी बसपाच्या सर्व पदाचा राजीनामा दिला होता, गेल्या एक महिन्यापासून ताजुद्दीन बाबा शेख हे राजकारणापासून अलिप्त होते. आम आदमी पार्टी सोलापूर जिल्हा यांच्यावतीने प्रभाकर क्षीरसागर व ताजोदीन ( बाबा ) शेख या वैराग येथील दोन युवा कार्यकर्ते यांचा आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला, यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील यांच्या वतीने पक्षप्रवेश करण्यात आले व जिल्हा संघटन मंत्री आनंद जाधव व सोलापूर शहर खजिनदार अल्ताफ तांबोळी इत्यादी उपस्थित होते.
0 Comments