शेतकरी संघटनेच्या राज्याध्यक्षपदी शंकर गायकवाड तर कार्याध्यक्षपदी मारुती कारकर


उस्मानाबाद |

 दि. 20 नोव्हेंबर,  आज रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये शेतकरी शेतमजूर संघटनेचे संस्थापक कोंडाप्पा कोरे यांनी सर्वानुमते नियुक्तीचे पत्र देऊन शेतकरी शेतमजूर संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी शंकर गायकवाड तर राज्य कार्याध्यक्षपदी मारुती कारकर यांची निवड केली.

 त्यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, मी सध्या कै.मा. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेमध्ये राज्य उपाध्यक्ष असून या दोन्ही संघटनांची विचारधारा एकच असल्यामुळे व कोंडाप्पा कोरे हे शरद जोशींना मानणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी मला दोन्ही संघटनांमध्ये काम करण्यासाठी संमती दिल्यामुळे आज पासून मी दोन्ही संघटनेमध्ये क्रियाशील राहणार असल्याचे यावेळी गायकवाड यांनी बोलताना सांगितले. निवडीनंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व बहुसंख्य शेतकऱ्यांनी शंकर गायकवाड व मारुती कारकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments