धनुष- ऐश्वर्याकडून चाहत्यांना मिळणार 'गुडन्यूज' ?


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील  सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांनी जवळपास नऊ महिन्यांपूर्वी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. 18 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांचं पुन्हा पॅचअप झालं की नाही, याबाबत अधिकृत माहिती नव्हती. आता दोघांनीही घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

ऐश्वर्या ही सुपरस्टार  रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषने 2004 मध्ये ऐश्वर्याशी लग्नगाठ बांधली होती. या दोघांना यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं आहेत. आता धनुष आणि ऐश्वर्या यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेत असल्याची चर्चा असली तरी या दोघांनी अद्याप त्यावर भाष्य केलं नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी सोशल मीडियावर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. आमच्या खासगी आयुष्याचा आदर करत थोडा वेळ द्या, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली होती. '18 वर्षांची सोबत, मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही एकत्र सहजीवनाचा प्रवास केला. आज आम्ही अशा टप्प्यावर आहोत, जिथून आमचे मार्ग वेगळे होणार आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला थोडा वेळ द्यावी अशी पोस्ट धनुषने लिहिली होती.

या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केल्यानंतर धनुषच्या वडिलांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. “त्या दोघांमध्ये भांडण झाल्यं. हे भांडण कौटुंबिक आहे. पण मी त्यांच्याशी बोलून दोघांनाही समजावलंय”, असं ते म्हणाले होते. धनुष हा प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे.बतो अभिनेत्यासोबतच निर्माता, डान्सर, पार्श्वगायक, गीतकार आणि संवादलेखकही आहे.

Post a Comment

0 Comments