प्राजक्ता माळी ही मराठी इंडस्ट्रीतली सध्याची सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री. तिनं पोस्ट शेअर केली नाही तोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव सुरु होतो. सध्या प्राजक्ता पुन्हा एकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे,ज्याचं कॅप्शन आहे...' जेव्हा तुमच्या क्रशसोबत तुमचं लग्न होतं...', आता प्राजक्ता असं म्हणतेय म्हटल्यावर नक्कीच वाटेल हिचं लग्न ठरलं की काय? पण' गोष्ट थोडी वेगळी आहे.
प्राजक्ता माळी टि.व्ही, सिनेमा, वेब सिरीज, नाटक अशा सगळ्याच प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत पुढे आलेली एक हरहुन्नरी अभिनेत्री. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता चर्चेत आली ते तिच्या 'रानबाजार' मधील बोल्ड भूमिकेमुळे. त्यावेळी तिच्या त्या बिनधास्त भूमिकेवरनं तिची जितकी प्रशंसा झाली, तितकंच तिला ट्रोलही केलं. पण प्राजक्ता ट्रोलिंगचा फार विचार करत नाही असं ती मागे ईसकाळच्या एका मुलाखतीत म्हणाली होती.
प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच राजकारण, समाजकारण अशा विषयांवरही व्यक्त होताना दिसते. नुकताच तिनं आपल्या 'लकडाऊन' सिनेमाचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शन दिलं की, 'जेव्हा तुमच्या क्रश सोबत तुमचं लग्न होतं. आता असं म्हटलंय कारण हा सिनेमा आला तेव्हा प्राजक्ता प्रत्येक मुलाखतीत म्हणत होती की अंकुश चौधरी हा तिचा खूप आधीपासूनचा क्रश होता, त्याच्यासोबत काम करणं तिचं स्वप्न होतं. आणि त्याच्या सोबत अभिनेत्री म्हणून काम केल्यावर आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्याचं तिनं म्हटलं होतं. आता पुन्हा हा सिनेमा झी युवावर येत्या रविवारी प्रसारित केला जाणार आहे त्यामुळे याचं हटके प्रमोशन करण्याच्या निमित्तानं प्राजक्तानं ही पोस्ट केली.
लोकांना देखील प्राजक्ता आणि वाहिनीतर्फे आवाहन करण्यात आलं आहे की, तुमच्या क्रश सोबत व्हिडीओ पोस्ट करा. प्राजक्ताच्या या क्रशवाल्या पोस्टवर लोकांच्या कमेंट्स धमाल आणणाऱ्या आहेत. काहींनी प्राजक्ताला बिनधास्त म्हटलंय की तुच माझी क्रश आहे, देव करो आणि आमची इच्छा पूर्ण होवो, जसं तू म्हणालीयस अगदी तसं. आता असं बोलून अनेक चाहत्यांनी प्राजक्ताला थेट लग्नाचीच मागणी घातलीय ना राव.
0 Comments