परांडा |
परंडा शहरामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी क्रांती करिअर अकॅडमी ही नेहमीच अग्रेसर असते, येत्या शनिवारी राज्यस्तरीय अॅथलेटिक्स निवड चाचणी क्रांती करिअर अकॅडमी येथे होणार आहे. या सराव चाचणीमध्ये जिल्हाभरातून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन क्रांती करिअर अकॅडमीचे संचालक पांडुरंग कोकणे व विकास काळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय २३ वर्षांखालील पुरुष व महिला स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटना व क्रांती करिअर अकॅडमी परंडा यांच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी परंडा येथे २४ व २५ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
क्रांती करिअर अकॅडमी, डीएड कॉलेज जवळ देवगाव रोड परांडा येथे शनिवारी सकाळी ८:३० वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. या स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटक, ५००० मीटक, १०००० मीटर, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, भालाफेक, हर्डल्स इत्यादी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमधून प्रत्येकी २ विजयी खेळाडू मुला व मुलींची निवड उस्मानाबाद जिल्हा संघात केली जाणार आहे. खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, जन्माचा दाखला (नगरपालिका, ग्रामपंचायत), २ पासपोर्ट साइज फोटो, दहावी प्रमाणपत्र सोबत आणावे.
यासाठी संजय कोथळीकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये सदस्य म्हणून राजेंद्र सोलनकर, सुरेंद्र वाले, मुनीर शेख, माऊली भुतेकर, अजिंक्य वराळे, राम भुतेकर यांची तर राजेश बिलकुले यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सदस्य म्हणून विकास काळे, दीपक ओव्हाळ, पांडुरंग कोकणे, योगेश उपळकर, रोहित सुरवसे, प्रशांत बोराडे, ऋषिकेश काळे, अश्विन पवार हे आहेत. स्पर्धा प्रमुख म्हणून सचिन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप व सचिव योगेश थोरबोले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी योगेश थोरबोले ( ९८६०६०९०५६) यांच्याशी संपर्क साधावा.
0 Comments