बार्शी ! नवऱ्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; पतीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहरातील भवानी पेठ येथे सासरच्या त्रासाला कंटाळून पंचवीस वर्षीय विवाहिता मिना रोहित सूर्यवंशी यांनी आत्महत्या केली आहे, ही घटना 6 सप्टेंबर रोजी बार्शी शहरामध्ये घडली आहे या घटनेची फिर्याद सात सप्टेंबर रोजी शहर पोलिसात मयत महिलेचा भाऊ राहुल मारूती दुर्गे वय-27 वर्शे,  रा.मुकुटबन ता.झरी (जामणी ) जि. यवतमाळ यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माहेरून गाडी घेण्यासाठी पैसे आण म्हणुन वारंवार दिलेल्या त्रासाला व मारहाणीला कंटाळुन तिने राहते घरात साडीने गळफास घेतला आहे. व ती उपचारादरम्यान मयत झाली आहे. पैशा साठी वारंवार मारहाण करून त्रास देवुन वारंवार तिला पैसे आण नाहीतर जीव दे असे म्हणून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे तिने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे, मयत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार रोहीत अशोक सुर्यवंशी रा. भवाणी पेठ, गवत गल्ली बार्शी भादवी कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments