धर्मादाय हॉस्पिटल आणि मंगेश चिवटेंची बार्शीला भेट



बार्शी |

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी बार्शीत साईसंजीवनी रुग्णालयात आरोग्य शिबिराला भेट दिली. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना चिवटे यांनी धर्मादाय हॉस्पिटलकडून गरीब आणि निर्धन रुग्णांना शासकीय लाभ दिला जात नसल्याची खंत व्यक्त केली. याबाबत, लवकरच मुख्यमंत्री आणि धर्मादाय आयुक्तांची बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे, बार्शीतील धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्यात असलेल्या रुग्णालयांची जबाबदारी निश्चितच वाढली आहे.

चिवटे यांनी बार्शीच्या मेडिकल हबचा आवर्जून उल्लेख केला. तर, डॉ. यादव हे वैद्यकीय क्षेत्रातील भीष्म पितामह असल्याचे सांगत त्यांच्या कार्याची महती एका शब्दात व्यक्त केली. त्यानंतर, येथील जगदाळे मामा हॉस्पिटललाही भेट दिली. त्यामुळे, आता तरी या हॉस्पिटलमध्ये धर्मादाय आयुक्त अंतर्गत असलेल्या योजनेतील लाभ निर्धन आणि गरीब रुग्णांना मिळवून देण्यास होत असलेली टाळाटाळ दुर्लक्षित राहता कामा नये.

रुग्णालयात निर्धन रुग्णांसाठी 10 टक्के खाटा आरक्षित ठेवल्याचे फलक दिसून येते. मात्र, तो फलक कायमस्वरूपी एकाच आकड्यात दिसतो. तर, येथे अनेकदा सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना धर्मादाय योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठी कसरत, वेळप्रसंगी भांडण करावं लागतं, असे रुग्णांचे नातेवाईक सांगतात. नियम दाखवल्यास प्रशासनाकडून टाळाटाळ करत या योजनेत 'राम' नसल्याची भाषा केली जाते. या हॉस्पिटलमध्ये धर्मादाय योजनेची अंमलबजावणी पारदर्शी झाल्यास हे रुग्णालय वैद्यकीय सेवा क्षेत्रात निश्चितच आदर्श निर्माण करतील. त्यासाठी, प्रशासनातला राम जागा हवा

Post a Comment

0 Comments