ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन मॅचची सीरिज जिंकल्यानंतर आता टीम इंडिया टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप (2023 cricket world cup) खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा होणार आहे. ऑलराउंडर रवींद्र जडेजा दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. दरम्यान, टीममध्ये संजू सॅमसनच्या नावाचाही समावेश करण्यात आला नव्हता, त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले होते. पण आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. संजू लवकरच टीम इंडियाचा उपकर्णधार होऊ शकतो अशी चर्चा आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन-डे सीरिजमध्ये संजू सॅमसन टीम इंडियाचा उपकर्णधार असू शकतो. तर, शिखर धवन टीम इंडियाचा कॅप्टन असेल. वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या (2023 cricket world cup) टीम इंडियाचे खेळाडू टी-20 सीरिजनंतर ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहेत. तर दुसरी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सीरिज खेळणार आहे.
संजू सॅमसन सध्या न्यूझीलंड-ए विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये इंडिया-ए चा कॅप्टन आहे. तीन मॅचची ही सीरिज इंडिया-ए ने जिंकली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन मॅचेसची वन-डे सीरिज 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दुसरी वन-डे 9 ऑक्टोबर आणि तिसरी वन-डे 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या तिन्ही मॅचेस अनुक्रमे लखनौ, रांची आणि दिल्ली येथे खेळवल्या जातील.
दरम्यान, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये महत्त्वाचे खेळाडू नसल्याने त्याचा परिणाम टीमच्या कामगिरीवर होऊ शकतो. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा स्टार खेळाडू दीपक हुड्डा दुखापतीमुळे, तर बॉलर मोहम्मद शमी करोनाची लागण झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमधून बाहेर पडले आहेत. तसंच, खेळाडू हार्दिक पंड्याला बीसीसीआयने विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या क्रिकेट सीरिजमध्ये हे महत्त्वाचे खेळाडू खेळू शकणार नाहीत त्यामुळे संघाला त्यांच्याशिवायच उच्च दर्जाची कामगिरी करावी लागेल.
0 Comments