बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी शहरातील तीन तोळा सोन्याचे ७० हजार किमतीचे गंठण दोन इसमानी नवस फेडण्याच्या बहाणा करुन महिलेच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथे घडली. संगीता विनायक जाधव (वय ५०) रा. वाणी प्लॉट, बार्शी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
हि घटना १९ ऑगस्ट रोजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास एक इसम त्यांच्या घरासमोर आला. वाणी यांच्या घराशेजारी असलेल्या गणपती मंदिरात, माझ्या आजीने बोललेला नवस फेडायचा आहे, तरी तुम्ही माझ्यासोबत मंदिरात चला असे सांगून त्यांना मंदिरात नेले. नवस फेडताना तुमच्याजवळील काही तरी सोन्याची वस्तू ठेवा असे म्हणत त्यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे गंठण मंदिरातील एका लहान पिशवीत घालून देवासमोर ठेवल्याचे नाटक केले. आणि घाईघाईने तो इसम बाहेर मोटरसायकल घेऊन थांबलेल्या दुसऱ्या इसमाच्या मागे बसून पळून गेला.
त्यावेळी वाणी यांनी त्या पिशवीत हात घालून पाहिले असता त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुध्द भा.दं.वि. कलम ३४, ४२० नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments