'या' शहरात दोन हॉटेलमधून डझनभर प्रेमीयुगलांना पकडले



जळगाव शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले. अशातच आज शहरातील दोन हॉटेलवर पोलिसांनी छापेमारी करत डझनभर कपल्सला पकडले. याघटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कपल्सला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी कामी त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

औरंगाबाद महामार्गावर आर.एल.चौफुली ते जळगाव काटा दरम्यान असलेल्या एका हॉटेलवर आणि भुसावळ महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय नजीक असलेल्या एका हॉटेलवर पथकाने छापा टाकला. दोन्ही ठिकाणाहून पथकाने १८ पेक्षा जास्त तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, पथकाने धरपकड केल्याने प्रेमीयुगलांचे चेहरे रडके झाले असून पुढे काय होणार? अशी चिंता त्यांना लागून आहे.

Post a Comment

0 Comments