गेल्या काही दिवसापासून रणजितसिंह डिसले गुरुजी हे वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत होते. प्रशासकीय यंत्रणा व डिसले गुरुजी यामध्ये कलगीतुरा रंगलेला सर्वश्रुत आहे. दोन ऑगस्ट रोजी त्यांचा राजीनामा आहे हि जिल्हा परिषदेने नामंजूर केला होता, या सर्व घडामोडी च्या पार्श्वभूमीवर नऊ ऑगस्ट रोजी पहाटे ग्लोबल टीचर अवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले हे अखेर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी अमेरिकेला रवाना झाले.
अमेरिकन सरकारची प्रतिष्ठीत फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. या स्कॉलरशिपद्वारे ते सहा महिने अमेरिकेत राहून संशोधन करणार आहेत. स्कॉलरशिप जाहीर झाल्यानंतर डिसले यांनी शैक्षणिक रजा मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी शिक्षण विभागाकडून मोठा त्रास देखील त्यांना सहन करावा लागला. अखेर तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मध्यस्तीनंतर डिसले यांची शैक्षणिक रजा मंजूर झाली. जुलै २०२२ मध्ये डिसले यांनी आपल्या उपशिक्षक पदाचा राजीनामा देखील दिलेला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. यानंतर २ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आरोप, चौकशी इत्यादीच्या फेऱ्यानंतर रणजितसिंह डिसले अखेर अमेरिकेला रवाना झाले आहेत. या दौऱ्यापूर्वी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील भेट घेतली.
0 Comments