नुकत्याच कॉफी विथ करण मध्ये येऊन गेलेले अनन्या पांडे आणि विजय देवर कोंडा यांच्यामध्ये प्रेम फुलत असल्याचे नेहमीच बोलले जाते. सोशल मीडियावर देखील त्यांची खूप चर्चा आहे. त्यांचा चित्रपट लायगर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचे फोटो वायरल झाले आहेत. हे फोटो विजयच्या हैदराबादच्या घरातले आहेत. या फोटोमध्ये विजयची आई पूजेचे ताट सजवताना दिसत आहे तर, काही ब्राम्हण मंत्र म्हणताना दिसत आहेत.
यावरून या दोघांचा साखरपुडा झाला की काय? अशी चर्चा रंगली आहे. तर असे काहीही नसून मुलांच्या कल्याणासाठी आणि भविष्यासाठी विजयच्या आईने ही पूजा ठेवली होती आणि प्रमोशनच्या निमित्ताने हैद्राबादमध्ये केलेली आनन्या विजयच्या घरी जाऊन या पूजेत सहभागी झाली. तिने विजयच्या आईला धन्यवाद म्हणत, हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मात्र लोकांनी हा तिच्या लग्नाचा घाट असल्याचे सांगत हे दोघेजण लपवत असल्याचे बोलणे सुरू केले आहे. आता हे दोघे खरंच विवाहबंधनात अडकणार आहेत की केवळ चर्चा आणि अफवा आहे? हे येता काळ ठरवेल. कारण बॉलिवूडमध्ये नाते बनतात तसेच तुटतात आणि तुटलेली नाती परत एकत्र येतात हे आपण अनेकदा पाहिले आहे.
0 Comments