धक्कादायक! पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून ; महिलेला करायला लावली सर्वांसमोर अंघोळ



पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घरामध्ये सुख, शांती नांदावी, भरभराट व्हावी म्हणून पती, सासू, सासरे यांनी अघोटी पूजा करीत सुनेला सर्वांसमोर आंघोळ करायला लावली आहे. या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पती, सासू, सासरे, मांत्रिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीने संगनमताने केली पत्नीची फसवणूक अत्याचार की
पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तित्यावर 3 मे 2013 पासून आतापर्यंत अत्याचार होत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या सर्व प्रकारात पतीनेदेखील त्याच्या आई वडील आणि मांत्रिक यांच्या संगममताने पत्नीवर अत्याचार करीत तिची फसवणूक केली आहे. तसेच, धक्कादायक बाब म्हणजे घरात तसेच व्यवसायात भरभराटी यावी, घरामध्ये सुख, शांती नांदावी, भरभराट व्हावी व पत्नीवरील भानामती नाहीशी व्हावी आणि पुत्रप्राप्ती होण्यासाठी फिर्यादीला रायगडला नेऊन सर्वांसमोर अंघोळ करायला लावली.

सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल याबाबत पती शिवराज कोरटकर (वय ३६) रा. सदनिका क्र. ९०३ कात्रज आंबेगाव, सासरे राजेंद्र कोटटकर (वय ६४), सासू चित्रालेखा, मांत्रिक मौलाना बाबा जामदार (वय ६२)यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पती, सासरे, सासूला पोलिसांनी अटक केली असून, मांत्रिक अजूनही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. घरामध्ये सुख, शांती नांदावी भरभराट व्हावी व पत्नीवरील भानामती नाहीशी व्हावी आणि पुत्रप्राप्ती होण्यासाठी फिर्यादीला रायगडला नेणून सर्वांसमोर अंघोळ करायला लावली.

Post a Comment

0 Comments